एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

मुंबईत या विमानाने इमर्जन्सी लॅडिंग केले.

Updated: Oct 12, 2018, 08:24 AM IST
 एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग title=

मुंबई: एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी रात्री त्रिची विमानतळावर अपघात झाला. सुदैवाने यावेळी मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, त्रिची विमानतळावरील संरक्षक भिंतीला हे विमान धडकले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मात्र, विमानातील सर्व १३० प्रवासी सुखरूप आहेत. 
 
 दरम्यान, या घटनेनंतर शुक्रवारी पहाटे मुंबईत या विमानाने इमर्जन्सी लॅडिंग केले. तांत्रिक कारणामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
 अपघातानंतर सर्व प्रवासी घाबरले होते. सर्व प्रवाशांना मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्थेची सोय केली जात आहे. अपघातानंतर मंत्री नटराजन यांनी विमानतळाला भेट देत दुर्घटनेची माहिती घेतली.