मुंबई : काम न करता, शासकीय तिजोरीतून निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात सांगली जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी त्यांनी प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली.
#BreakingNews । काम न करता शासकीय तिजोरीतून निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करणार । उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा । प्रश्नोत्तराच्या तासात केली घोषणा @AjitPawarSpeaks @ashish_jadhao https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/sGdGzNMZZP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 13, 2020
अधिकाऱ्यांनी काम न करताच पैसे काढल्याचं फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत मान्य केलं. त्यावर हा सरकारच्या तिजोरीवर दरोडा आहे असं सांगत, याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला दिले. त्यावर या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून बडतर्फीची कारवाई केली जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली.
0