BMC Job: मुंबई पालिकेत चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बीएमसीअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ वकील (Junior Lawyer) पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एलएलबी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवाराकडे बार काऊन्सिलची सनद असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडून ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्युनिअर लॉयरच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 50 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करावी लागणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
16 फेब्रुवारी 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. मुंबई पालिकेची अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई पालिकेत वैद्यकीय अधिकारी/सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. पालिकेत वैद्यकीय अधिकारी/सहाय्यक वैद्यकीय अधिकारीच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जातील. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून एम.बी.बी.एस. किंवा समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. उमेदवाराची महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलकडे नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. उमेदवारांस संगणकाचे आवश्यक ते ज्ञान असावे. यासाठी उमेदवारांना 25 जानेवारीपर्यत अर्ज करता येईल. तर 30 जानेवारी रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी आपले अर्ज आस्थापना कार्यालय, पहिला मजला राजावाडी रुग्णालय, घाटकोपर, मुंबई –400077 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.