मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून तुरूंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या मतदानासाठी प्रयत्न केले जात आहे. काल PMLA न्यायालयाने त्यांना मतदानाची परवानगी नाकारली होती. मलिक यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतू आज उच्च न्यायालयाने त्यांना परवानगी नाकारली आहे.
मंत्री नवाब मलिक यांची याचिका चुकीची असून, त्यांना मतदानाची तूर्तास परवानगी देता येणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आला.
मात्र नवाब मलिक यांच्या वतीने याचिकेत सुधारणा करून पुन्हा याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय. याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी मलिक यांच्याकडून करण्यात येणार आहे.