मुंबई : विरारमधील (Virar Hospital) विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh Hospital) अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहोचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे.
Maharashtra | 13 people have died in a fire that broke out at Vijay Vallabh COVID care hospital in Virar, early morning today pic.twitter.com/DoySNt4CSQ
— ANI (@ANI) April 23, 2021
एसीत स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरु राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Maharashtra | 13 people have died after a fire broke out in the Intensive Care Unit (ICU) around 3am today. 21 patients including those in critical condition have been shifted to another hospital: Dr. Dilip Shah, official, Vijay Vallabh COVID care hospital, Virar pic.twitter.com/0GNUlHlgt4
— ANI (@ANI) April 23, 2021
विरारच्या रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. एसीत स्फोट होऊन ही आग लागली होती. आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. या घटनेची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्याचवेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. रुग्णालायात भीतीचे वातावरण पसरले होते.