मुंबई : काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्य सरकार राज ठाकरेंना (Raj Thackeray) घाबरतं, अशी खळबळजनक टीका निरुपम यांनी केली आहे. संजय निरूपम यांना असं का वाटतं? पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट. (congress leader sanjay nirupam criticize to mahavikas aghadi over to mns chief raj thackeray)
औरंगाबादच्या भर सभेत मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंनी दिलेलं हे आव्हान. हे आव्हान होतं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारला. या चिथावणीखोर भाषणाबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र त्यापुढे गृहखात्याकडून कारवाईची गाडी काही पुढे हलली नाही.
त्यामुळेच विरोधकांसोबतच आता सत्ताधारी पक्षातील नेतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. काँग्रेस नेते संजय निरूपन यांनी यावरून सरकारला घरचा आहेर दिलाय.
मराठी विरुद्ध उत्तर भारतीय अशी राज ठाकरेंवरची जुनी खुन्नस त्यांनी बाहेर काढल्याचं मानलं जातंय. सरकार घाबरतंय, अशी टीका करून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला. शिवाय गृहखातं सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधल्याचं बोललं जातंय.
भोंग्यांवर हनुमान चालिसा लावणा-या मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. पण गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी राज ठाकरेंची साधी पोलीस चौकशी देखील झालेली नाही. त्यामुळं राज ठाकरेंना खरंच सरकार घाबरतंय का, हा निरुपमांचा सवाल कायम राहतो.