मुंबई : Coronavirus disease : मुंबईत वाढत्या कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. ज्या भागात कोरोनाच्या रुग्णवाढ होत आहे. (Coronavirus disease) त्या ठिकाणी ग्रुप टेस्टिंग, झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांमध्ये दिवसांतून 5 वेळा सॅनिटायझेशन करा, जम्बो कोविड सेंटरचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल ( Municipal Commissioner) यांनी प्रशासनाला दिले आहेत.
तसेच वाढत्या रुग्णसंख्येमुळं जम्बो कोविड सेंटर, सर्व वॉर्ड रुम आणि खासगी रुग्णालयांतील बेड तैनात ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे वाढतं प्रमाण पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी पाच राज्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.
या सर्व राज्यांमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या राज्यांना आरोग्य मंत्रालयाने काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. शुक्रवारी देशात 4000 हून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळलेत. गुरुवारच्या तुलनेत हे 8.9 टक्के अधिक आहे. त्यापैकी 33.9 टक्के प्रकरणे एकट्या केरळमध्ये आढळून आली आहेत.
- कोरोनासह पावसाळी आजार रोखण्यासाठी कार्यवाही करा
- 12 ते 15 वर्षे वयोगटाच्या वेगाने लसीकरणासाठी विशेष मोहीम
- सेल्फ टेस्टिंग कोव्हिड कीटची माहिती एकत्र करा
- कोव्हिड उपाययोजनांसंबंधीच्या प्रस्तावांना प्राधान्य द्या
- पावसाळ्यात खड्यांसह नागरी समस्या सोडवण्यासाठी वॉर्ड वॉर रुमचे सहाय्य घ्या
- मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करा
- कोव्हिडसदृश रुग्णांची तपासणी ओपीडीमध्ये करा