धक्कादायक! मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील ७ जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील ७ जण कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म

Updated: Apr 7, 2020, 05:45 PM IST
धक्कादायक! मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील ७ जण कोरोना पॉझिटिव्ह title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील ७ जण कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या ग्रँट रोड भागात एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली. यानंतर त्याच्या घरातल्या ६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये सगळे कोरोना पॉझिटिव्ह आले. मुंबई महापालिकेने आता ग्रँट रोडमधील ही इमारत सील केली आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७४८ वर पोहोचली आहे, तर मुंबईमध्ये कोरोनाचे राज्यातील सर्वाधिक ५२८ रुग्ण आहेत. सोमवारी २४ तासात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयातील ५२ कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिकेकडून वोकहार्ट रुग्णालयाचा परिसर सील करण्यात आला होता. याठिकाणी कंटेनमेंट झोनचे फलकही लावण्यात आले होते.

कोरोनाची ही वाढती आकडेवारी बघता मुंबईतील अनेक भाग हॉटस्पॉट ठरत आहेत. मुंबईत आता ८ वॉर्ड सर्वाधिक डेंजर झोन, अतिगंभीर क्षेत्र असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबईमधील डेंजर झोन 

जी साऊथ - लोअर परळ आणि वरळीचा परिसर

ई वॉर्ड - भायखळा , भायखळा फायर ब्रिगेड आणि आसपासचा भाग 

डी वॉर्ड - नाना चौक ते मलबार हिल परिसर 

के वेस्ट - अंधेरी पश्चिमचा भाग 

पी नॉर्थ - मालाड, मालवणी , दिंडोशीचा भाग

एच ईस्ट- वांद्रे पूर्व चा भाग, वाकोला परिसर  कलानगर ते सांताक्रुझ (मातोश्री)

के ईस्ट - अंधेरी पूर्व चा भाग, चकाला, एमआयडीसी

एम वेस्ट - मानखुर्द परिसर