महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर पुढील २४ तासात वादळाची शक्यता

 महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला वादळाचा धोका असल्याचा इशारा दिलाय. 

सुरेंद्र गांगण | Updated: May 26, 2018, 04:07 PM IST
महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर पुढील २४ तासात वादळाची शक्यता title=

मुंबई : मान्सून अंदमानमध्ये कालपासून सक्रिय झालाय. दक्षिण अंदमानमध्ये मान्सून दाखल झालाय. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला वादळाचा धोका असल्याचा इशारा दिलाय. मिनुकू नावाचे वादळ पुढील २४ तासात महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळाची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलेय. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.

पाऊस आला रे आला

मान्सून अंदमानात दाखल  झालाय. मान्सूनची पुढील वाटचालीसाठीही वातावरण अनुकूल, असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेय. मान्सून २३ मे २०१८च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला होता. मात्र, मान्सून २५ मे रोजी अंदमानात दाखल झालाय. 

हवामान विभागाचा अंदाज

येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अंदमानच्या किनाऱ्यावर येऊन धडकण्यासाठी पोषक वातावरण  निर्माण झाले, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली होती. तसेच गेल्या दोन तीन दिवसात हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या प्रगतीसाठी योग्य वातावरण तयार झाले होते. या पोषक वातावरणामुळे अखेर मान्सून अंदमानमध्ये दाखल झालाय. हवामान विभागाकडून गेल्या आठवड्यात वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार २३ मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता होती. मात्र, तो काल अंदमानमध्ये दाखल झालाय.

मान्सून केरळच्या दिशेने

दरवर्षी २५ मे रोजी अंदमानमध्ये  दाखल होतो. मात्र, यावेळी तो २५ मे रोजी अंदमानात दाखल झालाय. त्यामुळे यंदा मान्सून केरळमध्ये २९ मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे..यामुळे मान्सून महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आलेय आहे.