मुंबई : मुंबईत अनधिकृत बांधकामांनी विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची वाट अडवल्याची घटना समोर आलीय. साकीनाका भागातील ९० फूटी रोडवरील
श्री बाल गणेश मित्र मंडळ गेल्या १४ वर्षांपासून गणपती बसवत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंडळानं मूर्तीकाराकडे ऑर्डर दिली. पण ही मूर्ती मंडपात कशी आणायाची असा प्रश्न मंडळाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. कारण गणरायाच्या आगमन मार्गावरच अनधिकृत बांधकाम करून रूम बांधण्यात आलीय. त्यामुळं चिंचोळ्या जागेतून गणरायाची मुर्ती मंडपापर्यंत नेणं शक्य होणार नाही.
धक्कादायक म्हणजे एक आठवड्याच्या कालावधीत हे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. याबाबत पोलीस आणि बीएमसीच्या एल वॉर्डकडे तक्रारही देण्यात आलीय. पण कुठलीच कारवाई होत नसल्यानं गणरायाचं आगमन धोक्यात सापडलंय.