मुंबई : ब्रिज कोर्सच्या मागणीसाठी होमिओपॅथिक डॉक्टर आक्रमक झाले आहेत. 'आयुष'च्या डॉक्टरांची जे जे रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने सुरू आहेत. ब्रिज कोर्सच्या मागणीबाबत लेखी आश्वासनाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ही मागणी पूर्ण न झाल्यास जेजे रुग्णालय ते आझाद मैदाना मोर्चा काढण्याचा निर्धार आयुष डॉक्टरांच्या संघटनेनं केलाय. त्यामुळं हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान पोलिसांनी आंदोलक डॉक्टरांना ताब्यात घेतलंय. गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानात होमिओपॅथीक डॉक्टरांचं विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे.