मुंबई : आयकर विभागाला ज्या कागदपत्रांची माहिती हवीये ती माहिती यशवंत जाधव देतील. असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
आयकर विभागाच्या छाप्यादरम्यान, जाधव अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करतील. जाधव भीमपुत्र आहेत ते घाबरणारे नाहीत. शिवसैनिक कुठेतरी चुकीचा वागू शकतो अनुचित प्रकार नको म्हणून मी इथे आलीये. असे देखील पेडणेकर यांनी म्हटलं.
आज ज्यापद्धतीने यंत्रणेचा वापर सुरू आहे. भाजपची सत्ता नाही तिथे सर्वांना त्रास होतोय म्हणून आम्ही घाबरून बसणार नाही. भाजपवले फक्त सगळे दूध के धुले आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच वाईट असे आहेत असं वातावरण तयार करण्यात येतंय. असाही टोला पेडणेकर यांनी लगावला.
यशवंत जाधव आयटी विभागाला योग्य ते सहकार्य करतील. ते आयटीला उत्तरं देण्यास समर्थ आहेत. वातावरण बिघडवू नका मुंबई महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम सुरू आहे. असंही पेडणेकर यांनी यावेळी म्हटलं आहे.