मुंबई : Kishori Pednekar on BJP and Navneet Rana :भाजपची अधिकृत भूमिका नवनीत राणा मांडतात हे भाजपने जाहीर करावे, असे थेट आव्हान शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. त्याचवेळी त्यांनी किरीट सोमय्या यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. धमकी देता का, जे असेल ते बाहेर येईल, घाबरत नाही, अडकवा, अग्निकुंडात मी उभी आहे, तुम्ही ( सोमय्या) मला धमकी दिली आहे, असे पेडणेकर म्हणाल्या.
तीन पैशांचा टिंब टिंब टिंब त्यांना करु देत, असं सांगत त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. पुढे पेडणेकर यांनी नवनीत राणा यांच्यावरुन भाजपला चांगलेच सुनावले आहे. या बाईला भाजपने दत्तक घेतले आहे, असे जाहीर करावे. तिचे काय चालले आहे ते तिला तरी समजते आहे का? भाजपचे मुद्दे बोलत आहे, त्यांना वादंग करायचा आहे, भाजपने उसने आव आणून लढायला सोडले आहे. चवताळलेल्या असतात ना तशा त्या आहेत, यामागील लोक वेगळे असतात, भाजपच्याच त्या आहेत हे त्यांच्या विधानाने स्पष्ट झाले, भाजपची अधिकृत भूमिका त्या मांडतात हे जाहीर करा, असे भाजपला पेडणेकर यांनी आव्हान दिले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आरसा दाखवला गेला, आम्ही ठोक के जवाब घ्यायला तयार आहोत. त्यावेळेच्या गोष्टी आम्ही जवळून पाहिल्या आहेत. आगडोंब बाळासाहेबांनी आवरला, इतिहास बदलला जात आहे. धमकी देता का, जे असेल ते बाहेर येईल, घाबरत नाही, अडकवा, अग्निकुंडात मी उभी आहे, तुम्ही मला धमकी दिली आहे, असे त्यांनी किरीट सोमय्या यांना सुनावले आहे. तेजस याने मोठा खेकडा आणला आहे, त्यावरही घाला घालतील, त्यांच्यावरही केसेस टाका, असे थेट जाहीर आव्हान सोमय्या यांना दिले.
सोमयया सारख्या विचित्र माणसावर किती बोलायचं. केतकी चितळे बद्दल काही बोलायचं नाही, ती मनोरुग्ण आहे, वयाच, जेंडरच आणि राजकारणात वयाने मोठ्या नेत्यांबद्दल बोलताना भान ठेवावे, असे त्या म्हणाल्या. गांडूळ गटारात राहतात, बेडूक पाण्यावर जगतात. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शोधावं तुम्ही कुठे आहेत हेही शोधावं, फडणवीस यांचं वय हे त्यावेळी शाळा, कॉलेजमध्ये असतील, मिश्कीलपणे उद्धव ठाकरे बोलले आहेत, असे त्या म्हणाल्या.
मुंबईकरांना चांगल्या शाळा आल्या, सर्वांसाठी पाणी, बिल्डरने वंचित ठेवलेल्या इमारतीत पाणी देणार आहोत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. लोकांचं मनोरंजन होत आहे, असे त्यांनी मनसेवर तोंडसुख घेतले.