महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत 45 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये जोगेश्वरी पूर्वमधून मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनिषा वायकर कोण आहेत? जाणून घेऊया त्यांचं प्रोफाईल?
मनिषा वायकर या खासदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून रविंद्र वायकर यांनी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता रविंद्र वायकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीत मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनिषा वायकर यांनी जोगेश्वरी पूर्व मतदार संघातील सामान्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत.
रवींद्र वायकर 2019 मध्ये मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेकडून विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत ते उद्धव ठाकरेंना सोडून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेले आणि नंतर उत्तर-पश्चिममधून निवडणूक लढवली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना त्यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मनिषा वायकर यांचे नाव समोर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागून राहिल आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून अमोल किर्तीकर किंवा अनंत नर यांना उमेदवारी लढवू मिळू शकते अशी चर्चा आहे. जोगेश्वरी पूर्व मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भालचंद्र अंबरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.