मुंबई : राज्यात उद्यापासून बारावीच्या परीक्षेला (HSC Exam 2022) सुरुवात होत आहे. राज्यात कोरोना परिस्थितीमुळे 2 वर्ष ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. मात्र यावेळेस परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे. बारावीची परीक्षा ही दोन वेळांमध्ये पार पडणार आहे. तब्बल १४ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी ही पराक्षी देत आपलं नशिब आजमवणार आहेत. परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना बोर्डाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पाल करावं लागणार आहे. (maharashtra hsc 12th exam 2022 exam will be started to tommarow 4 march know all detalis timetable and guideline ssc timetable 2022)
10 मिनिटांचा अधिक वेळ
ही परीक्षा एकूण 2 वेळेत पार पडणार आहे. त्यानुसार सकाळी 10.30 ते 2 आणि दुपारी 3 ते 6.30 या वेळेत परीक्षा पार पडणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न वाचण्यासाठी 10 मिनिटांचा जादा वेळ मिळणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना कोणते प्रश्न आधी सोडवायचे, याचा प्राधान्यक्रम निवडण्यास मदत होईल.
या गोष्टी लक्षात ठेवा
कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा पार पडतेय. कोरोनाचा जोर बऱ्यापैकी ओसरला आहे. मात्र कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करावं लागणार आहे. त्यानुरास विद्यार्थ्यांना मास्क आणि हँड सॅनिटायजर ठेवण आवश्यक असेल. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर 30 मिनिटं आधी पोहचायचं आहे.
दहावीच्या परीक्षा कधीपासून?
दरम्यान दहावीच्या परीक्षेला 15 मार्चपासून सुरुवात होणार असून शेवट 4 एप्रिलला होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा या पार पडल्या आहेत. तसेच जर काही विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे प्रात्यक्षिक देता आली नसेल, तरी घाबरुन जाण्याची काही गरज नाही. कारण लेखी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल. विद्यार्थ्यांना 5 एप्रिल ते 22 एप्रिलदरम्यान ही परीक्षा देता येईल.