मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असे दोन गट तयार झाले आहेत. राज्यत काही ठिकाणी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते, नेते आता हळूहळू शिंदे गटात सामील होत असल्याने उद्धव ठाकरेंची चिंता वाढली आहे. यामध्येच आता आदित्य ठाकरेंना मोठा दणका शिंदे गटाने दिला आहे.
ठाण्यातील हजारो युवासैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत. युवकांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी सरनाईक यांच्या नेतृत्त्वात युवासैनिक शिंदे गटात सहभागी झाले. शिंदेंनी उद्धव ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेंनाही मोठा धक्का दिला.
शिंदे गट वैगरे नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत. त्यांना आमची भूमिका पटली त्यामुळे त्यांनी आमच्या भूमिकेला समर्थन दिलं, त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मी त्यांना सांगितलं की त्यांचे जे काही प्रश्न असतील त्याच्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दुसरीकडे पालघर, पुणे, कल्याण डोंबिवली आणि कोल्हापुरातील अनेक नेते हे शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोल्हापुरात देखील ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यातच आत युवासैनिक शिंदे गटात समाविष्ट झाल्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची चिंता वाढली आहे.