Maharashtra Politics : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत शुक्रवारऐवजी गुरुवारपासूनच सुनावणी सुरु होतेय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेंकरांकडून (Rahul Narvekar) वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. दुपारी 2 वाजल्यापासून विधानभवनात सुनावणीला सुरुवात होणार आहे. आमदार अपात्रता सुनावणीचं वेळापत्रक कसं असेल पाहुयात...
आमदार अपात्रता सुनावणीचं वेळापत्रक
12 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद, 23 नोव्हेंबरनंतर 2 आठवड्यांत अंतिम सुनावणी सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्याच्या ठाकरे गटाच्या (Thackeray Group_ याचिकेवर उद्या सुनावणी. दरम्यान अपात्रतेची टांगती तलवार असणारे ते 16 आमदार कोण आहेत ते पाहूयात
'या' आमदारांवर टांगती तलवार
1. एकनाथ शिंदे, 2 .अब्दुल सत्तार, 3. संदीपान भुमरे, 4. संजय शिरसाट, 5. तानाजी सावंत, 6. यामिनी जाधव ,7. चिमणराव पाटील , 8.भरत गोगावले, 9.लता सोनवणे , 10. प्रकाश सुर्वे , 11. बालाजी किणीकर, 12. अनिल बाबर, 13. महेश शिंदे, 14. संजय रायमूलकर, 15. रमेश बोरणारे, 16. बालाजी कल्याणकर
आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्यानं होत आला.. आता प्रत्यक्ष या सुनावणीला सुरुवात होतेय, या सुनावणीच्या निकालावर राज्यातील अनेक राजकीय समीकरणं आहेत, इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंसह (CM Ekant Shinde) 16 आमदारांचं भवितव्यही अवलंबून आहे. त्यामुळे अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय..
राहुल नार्वेकरांना पाठवली होती नोटीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस पाठवली होती. शिंदे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली होती. याच याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने संबंधित प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी 2 आठवड्यांमध्ये लेखी उत्तर द्यावं असे आदेश कोर्टाने दिले.
प्रकरण काय?
महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेल्या शिंदेंनी जून 2022 मध्ये आपल्याच सरकारविरोधात बंड केलं. त्यावेळी त्यांच्याबरोबर सुरुवातीला 16 आमदार होते. शिंदेंसहीत हे 16 आमदार सुरतला गेले. यानंतर मूळ शिवसेनेनं बंडखोरीनंतर या आमदारांना नोटीस बजावली. या नोटीशीला 48 तासांमध्ये उत्तर द्यावे नाहीतर तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल असं या नोटीसमध्ये म्हटलं होतं. या नोटीसविरोधात शिंदे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर गुवहाटीला गेलेल्या शिंदे गटामध्ये मूळ शिवसेनेतील 40 आमदार मिळाले. पण अपात्रतेची नोटीस या 16 आमदारांना पाठवण्यात आली होती. नोटीसमध्ये सुरतला गेलेल्या आमदारांच्याच नावांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये नंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या 24 आमदारांचा समावेश नव्हता. म्हणूनच बंडखोरी करुन भाजपाबरोबर सत्ता स्थापन करणाऱ्या बंडखोर आमदारांची संख्या 40 असली तरी अपात्रतेच्या कारवाईमध्ये 16 आमदारांचं नावं आहे.