Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचा निर्णय घेतला (Shiv Sena (UBT) And vanchit bahujan aghadi Alliance) आणि मुंबईत पत्रकार परिषद घेत तो जाहीरही केला. आधीच महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीने (NCP) यावर सावध भूमिका घेतली आहे. पण ठाकरे गट आणि वंचितच्या युतीमुळे मविआमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या तू तू मै मै रंगलं आहे.
संजय राऊत यांचा इशारा
प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरुन संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. शरद पवार हे भाजपचे आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांविषयी अशी विधान करणं आम्हाला मान्य नाही, असे आरोप करणं गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंत शरद पवार यांच्याशी बोलताना आंबेडकरांनी जपून बोलावं असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
प्रकाश आंबेडकर यांचं प्रत्युत्तर
संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्याला प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. महाविकास आघाडीचा भाग होण्याची माझी इच्छा नाही, अस मी म्हणाणार नाही. पणं आमची युती शिवसेनेशी आहे. जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. शिवसेना आणि वंचित एकत्र लढली आणि बाकी एकत्र नाही आले तरी आम्ही सरकार बनवू असे आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत घेण्यावरून गेल्या दोन दिवसापासून मोठे वादंग सुरू आहे. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सुरू असलेला वाद आता खासदार संजय राऊत व प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. दरम्यान महा विकास आघाडी मध्ये येण्याबाबत यापूर्वीच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आपलं ठरलं असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत आपण चर्चेला तयार आहोत असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर आज शिक्षक मतदार संघ प्रचाराच्या निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिवमध्ये आले होते त्यावेळी पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली