मुंबई : Uddhav Thackeray Remarks On Balasaheb: महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दावा केला की, त्यांचे दिवंगत वडील आणि शिवसेनेचे संस्थापक प्रमुख बाळसाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना 2002 मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्याची मागणी केली तेव्हा त्यांना पाठिंबा दिला.
भाजपचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना मोदी यांना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी झाली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यादरम्यान भाजप नेते लालकृष्ण अडवाणी मुंबईत रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते आणि त्यांनी या मागणीवर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
ते म्हणाले की, रॅलीनंतर आम्ही बोलत होतो. बाळासाहेबांशी काहीतरी चर्चा करायची आहे, असे अडवाणी म्हणाले. त्यानंतर मी आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन निघालो. नंतर अडवाणींनी मोदींबद्दल बोलताना बाळासाहेबांना मोदी हटवण्याच्या मागणीबद्दल काय मत विचारले. त्यावेळी त्यांना हात लावयाचा नाही. त्यांना हटवू नये, असे सांगितले. तेव्हा मोदी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्यात आला नव्हता.
उद्धव ठाकरे म्हणाले, 'मोदींना हात लावू नका, असे बाळासाहेबांनी अडवाणींना सांगितले. मोदींना हटवल्यास भाजप गुजरात गमावेल आणि हिंदुत्वाला याचा फटका बसेल. एक व्यक्ती म्हणून मी पंतप्रधान मोदींचा आदर करतो, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजप आणि शिवसेना एकत्र राहिले होते. पण, 2019 मध्ये विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करुन राज्यात सरकार स्थापन केले. तर विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीने लढले होते.