Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, दुसरीकडे ठाकरे गटाची दिसणार ताकद

Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी अजूनही परवानगीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Updated: Dec 15, 2022, 12:36 PM IST
Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, दुसरीकडे ठाकरे गटाची दिसणार ताकद title=
Maha-vikas-aghadi

Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. (Maharashtra Political News) मुंबई पोलिसांनी अजूनही या मोर्चाला कोणतीही लिखित परवानगी दिलेली नाही. मोर्चा अगदी दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी अजूनही परवानगीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Maharashtra News in Marathi) तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेने जोरदार तयारीची सुरुवात केली आहे. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

मविआच्या मोर्चाला येथून सुरुवात

मुंबई पोलिसांनी सुचवल्याप्रमाणे मविआच्या या मोर्चाची सुरुवात भायखळ्याच्या क्रुडास कंपनीजवळून केली जाणार आहे. मुंबई पोलिसांकडून लिखित परवानगीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती असून ती आज उशिरा किंवा उद्या मिळण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन

महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मोर्चा काढणार आहे.  या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे. 17 डिसेंबरच्या मोर्चासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. बैठक झाल्यावर संध्याकाळी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदही होणार आहे. 

महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्याप मुंबई पोलिसांकडून परवानगी का दिलेली नाही, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालेय. दरम्यान, पोलीस आयुक्तांसोबत बैठक झाली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलिसांना सहकार्याची भूमिका केली आहे. त्यामुळे परवानगी देण्यास वेळ का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

शिवसेना ठाकरे गटाची दिसणार ताकद 

 महाविकास आघाडीच्या महामोर्च्यात शिवसेना ठाकरे गटाची ताकद दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईतील प्रत्येक शाखेतून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक शाखेत मोर्चाबाबतची भूमिका समजवून सांगितली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकी आधी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील आपली शक्ती मोर्च्याच्या माध्यमातून दाखवून देणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गटप्रमुख याबाबत नियोजन करत आहेत. क्रुडास कपंनी ते टाइम्स इमारत मोर्चा निघणार आहे. टाइम्स इमारत शेजारी भव्य स्टेज उभारलं जाणार असून यावरुन प्रमुख नेत्यांची भाषण होणार आहेत.