Mahim Dargah Construction : माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्यावर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. मुंबई महापालिकेच्या मदतीने अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. संवेदनशील प्रकरण असल्यानं 'झी 24तास' तोडकामाची दृश्य दाखवलेली नाहीत. मुंबई समुद्रातील माहीम दर्गा बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेची मदत घेऊन हे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. समुद्रातील मजार बांधलेली जागा मोकळी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ही मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. काल मुंबईतील गुढी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहीम दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता आणि कारवाईसाठी महिन्याची मुदत दिली होती. त्यानंतर रात्रीच जिल्हा प्रशासन जागे झाले आणि कारवाईचे आदेश दिले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माहीम समुद्रातील अनधिकृत मजारीबाबत इशारा दिल्यानंतर तातडीने कारवाईला सुरूवात झाली. जिल्हाधिका-यांनी माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीच्या तोडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने तोडक कारवाईसाठी महापालिकेची मदत घेतली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने कारवाईवेळीची कोणतीही दृष्य 'झी 24तास' ने दाखवली नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक जबाबदार वाहिनी म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. मुंबईत समुद्रात अनधिकृत बांधकाम करत दुसरी हाजी अली करण्याचा डाव असल्याचा व्हिडिओ दाखवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आणि रात्रीत कारवाई करण्याबाबत आदेश काढले होते.
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे, 'त्या' अनधिकृत बांधकामाची तात्काळ पाहणी
दरम्यान, समुद्राच्या आतील भागात बांधकाम असल्याने हे अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले. मुंबई महापालिका कायद्यानुसार समुद्राच्या किनाऱ्याच्या आतमध्ये दहा मीटर अंतर जरी असल्यास मुंबई महापालिकेची हद्द किनाऱ्यापलगतच असल्याने अशी कारवाई करता येत नाही, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर रात्रीच प्रशासनाचे आदेश, माहीम बांधकावर आता तोडक कारवाई
मुंबई जिल्हाधिकारी यांच्या हद्दीत या संदर्भात कारवाईचे अधिकार आहेत, असे पालिकेडून सांगण्यात आले. मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कारवाई संदर्भात निर्णय घेतील,असे सांगण्यात आले. मात्र, त्याआधीच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर सकाळी मेरिटाईन बोर्ड अधिकाऱ्यांनी पाहाणी करत पुढील कारवाई केली आहे.