मुंबई : सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांना युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात आला. त्यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप पुरस्कार आणि ७ कोटी रूपये असं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. @ranjitdisale तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय. pic.twitter.com/RaeaHwXP4P
— Raj Thackeray (@RajThackeray) December 4, 2020
शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या उल्लेखनिय कामाचे कौतुक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील केलं. 'युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय.' अंस ट्विट राज ठाकरे यांनी केलं.
पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळणार आहे.