Mumbai Landslide Video : मुंबईतील चेंबूरमधील एका धक्कादायक घटनेने मुंबईकरांची झोप उडवली आहे. चेंबूर सुमन नगरमधील राहुल नगर नंबर दोनमधील SRS इमारतीसमोरील जमीन अचानक खचली आहे.
या घटनेनंतर तातडीने इमारत खाली रिकामी करण्यात आली आहे. या घटनेचा भीतीदायक व्हिडीओ समोर आला आहे. SRS इमारतीमधील नागरिकांच्या जवळपास 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळल्या. खड्ड्यात गाडी कोसळण्याचा व्हिडीओ झी24 तासाच्या हाती लागला आहे. घटनेची माहिती मिळतात.
मुंबई अग्निशामक दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
#Chembur Road Collapse
Road in front of SRA building collapses in Chembur; 40-50 vehicles went into the ditch#Mumbai #MumbaiRains #Breaking @WIONews pic.twitter.com/kevyyjdei4
— Pranjal Mishra (@Pranjal_Writes) July 5, 2023
दरम्यान मुंबईत भांडुप, विक्रोळी आणि मागाठणे या सारख्या परिसरातील टेकडीच्या भागांवरील घरांना पावसाळात धोकादायक परिस्थितीत राहवं लागतं. मुंबईत पावसाळ्यात अशा अनेक घटना घडतात.