Mumbai grant road murder case latest news : लालबागमधील लेकीने (Lalbaug Murder)आईचे तुकडे तुकडे केलेली घटना ताजी असताना शुक्रवारी मुंबई पुन्हा एकदा भयानक (Grant Road News) घटनेने हादरली. दिवसाढवळा मुंबईतील (Mumbai News) ग्रँटरोडमधील पार्वती मॅन्शन या अप्सरा टॉकीज समोर चाळीत एक थरार हत्याकांड (murder case latest news) घडलं. एका माथेफिरुने हैवानीत भयानक रुप पाहून बघण्याचा अंगावर काटा आला. या भयानक दृष्य जणून एखाद्या चित्रपटातील भाग वाटेल असं होतं. (Mumbai Police)
ना लहान मुलं पाहिलं ना म्हातारी माणसं हा माथेफिरु चाकूने रपारप वार करत सुटला होता. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्यात एका दाम्पत्याची बळी गेला आहे. जयेंद्र मेस्त्री, ईला मेस्त्री आणि जेनील ब्रम्हभट यांचा मृत्यू झाला आहे. जेनील ब्रम्हभट याचं वय 18 वर्षाचं होतं. तिची आई स्नेहल आणि प्रकाश वाघमारे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांचावर रिलायन्स आणि नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार त्या माथेफिरुचं नाव चेतन गाला (Chetan Galla) असून तो 54 वर्षांचा मानसिक रुग्ण आहे. त्यांनी त्याला घटनेनंतर अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी आणि मुलं सोडून जवळच्याच चाळीत राहिला गेले होते. तेव्हापासून मानसिक तणावाखाली होतो. शेजऱ्यांच्या लोकांमुळे आपली बायको आणि मुलं सोडून गेली होती असा राग त्याचा मनात होता.
पार्वती मॅन्शन (Parvati Mansion) ही दादासाहेब भडकमकर मार्गावरील सर्वात जुनी इमारत आहे. शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर राहणारा चेतन अचानक आक्रोशात घराबाहेर आला. त्याचा शेजारी राहणारे जयेंद्र भाई त्यांचं वय 77 वर्ष तर बायको इलाबाई यांचं वय 70 यांचावर चेतनने चाकूने हल्ला केला. हे जोडपं वृद्ध असल्याने त्यांना चेतनच्या हल्ल्याला विरोध करु शकले नाहीत. माथेफिरूने जोरजोरात आरडाओरड करत दोघांनावर धारदार चाकूने सपासप वार केले.
इमारतीत घरकाम करणारा प्रकाश वाघमारे गॅलरीत झोपला असताना हा चेतन तिथे आला त्यावरही चाकूने वार केले. दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी झालेल्या गोंधळाने त्याला जाग आली होती. पण काही कळण्याचा आतच चेतनने त्यावर हल्ला केला होता. चाळीत एकच आरडाओरड सुरु होती. रस्त्यावरुन लोक पाहत होती आणि ओरड होती. (Mumbai grant road murder case latest news man five neighbors couple dead wanted to murder wife daughter Crime Diary video in marathi)
चाळीत अचानक कसला आवाज होतोय, रस्त्यावर लोक का अशी जमा झाली काही कळत नव्हतं. हत्येचा थरार लोक उघड्या डोळ्याने पाहत होती. चेतनच्या पत्नीची मैत्रिण स्नेहल ब्रम्हभट या पहिल्या मजल्यावर राहत होत्या. आवाज ऐकून त्या आणि त्यांची मुलगी जनील दुसऱ्या मजल्यावर धावत आल्या. चेतनच्या मनात या दोघांविषयी राग होता. चेतनने त्यांनाही सोडलं नाही. दुसऱ्या मजल्यावर रक्ताच्या थोराळ्यात पाहून जेनिलची बहीण देवांशी कशीबशी थोडक्यात बचावली. आई आणि बहिणीला अशा अवस्थेत पाहून ती पुढे गेलीच नाही.
दुसऱ्या मजल्यावर असलेल्या गालाने एका 10 वर्षाच्या मुलाला पकडलं आणि लोकांना त्याने घाबरवलं...पण रहिवाशांनी अलार्म लावला त्यामुळे तो घाबरला आणि त्याने त्या मुलाला सोडून दिलं. मुलाने त्याच्या तिसऱ्या मजल्यावरील राहत्या घरी त्या मुलाने धाव घेतली.
दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी राजू भाई यांनी सांगितलं की, त्यांना घरून फोन आला की, घरी येऊ नका. चेतनमुळे चाळीत झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितलं. या हल्ल्यात राजेश मोहिते 55 वर्ष आणि भरत मेहता 80 वर्षाचे ते जखमी आहेत.
चाळीमध्ये एकच थरार सुरु होता. कोणाला काही कळतं नव्हतं. इमारतीच्या खाली लोकांची गर्दी वाढली होती. जमाव ओरडून चेतनला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचा डोक्यावर रागाच आणि संशयचा भूत संचारलं होतं. तो कोणालाही ऐकत नव्हता. त्याला थांबविण्यासाठी मजल्यावरील काही रहिवासी काठ्या घेऊन चेतनच्या दिशेने निघाले...ते पाहून चेतने घरामध्ये धूम ठोकली आणि स्वत: ला घरामध्ये बंद केलं.
राजेश मोहिते आणि भरत मेहता
दुसरीकडे दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांना घटनेची माहिती मिळाली होती. तत्काळ एक पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलीस येईपर्यंत चेतनने स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. पोलिसांनी दरवाजा ठोठावला तरी तो दरवाजा उघडत नव्हता. पोलिसांपासून वाचविण्यासाठी त्यानं स्वतःचं नुकसान करण्याची धमकी दिली. तर पोलिसांनीही चेतनला जर तू ऐकलं नाही तर पोलिसांनी दरवाजा तोडण्याची धमकी दिली. अखेर 20 मिनिटांनी चेतनने दरवाजा उघडला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
जेनिल ब्रह्मभट्ट आणि अंजू पवार
शेजारच्या जोडप्यामुळे पत्नीने सोडल्याचा चेतनला संशय होता. या रागातून चेतनने शेजाऱ्यांवर हल्ला केल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार आठ दिवसांपूर्वी चेतनने चाकू आणला होता. त्याचा पत्नी आणि मुलाला हे कळलं होतं. त्यांनी तो चाकू लपवून ठेवला होता. पण त्याचा मनात राग वाढतं होता. त्याने दुसरा चाकू विकत घेतला आणि त्यातून ही घटना घडली.
#Mumbai: 54-year-old man went on a #stabbing spree on Friday afternoon, killing three of his neighbours and injuring two others. The shocking incident took place at a chawl called Parvati Mansion near Apsara cinema in #GrantRoad. Accused arrested by police.#BREAKING pic.twitter.com/Qa5l8uTBL4
— Free Press Journal (@fpjindia) March 24, 2023
चेतन यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. चेतनने त्यांना वारंवार घरी येण्याची विनंती केली, मात्र कोणीही त्यांचं ऐकलं नाही.
घटनेच्या दिवशीही आरोपीने त्याच्या कुटुंबीयांना घरी बोलावलं, मात्र कोणीही फिरकलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.