रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी महापौरांचा 'हा' महत्वाचा निर्णय

 मुंबई महानगर पालिकेने कठोर पावलं उचलली 

Updated: Apr 12, 2021, 12:35 PM IST
रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी महापौरांचा 'हा' महत्वाचा निर्णय title=

मुंबई : वाढत्या कोरोना (COVID19) रुग्णांच्या पार्श्वभुमीवर मुंबई महानगर पालिकेने (BMC) कठोर पावलं उचलली आहेत. रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishore Pednekar) यांनी माहिती दिली आहे.. प्रत्येक वॉर्डला दोन नोडल अधिकारी असणार आहेत. त्यामुळे जर 1916 वर कॉल बिझी येत असेल तर वॉर्डमध्ये कॉल करावा असे आवाहन महापौरांनी केलंय. 

24 तासाच्या आत कोरोना चाचणीचे रिपोर्ट देण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.  खासगी बेड अडवून ठेवतात त्यामुळे उर्वरित दिवस हॉटेलमध्ये राहण्याची सोय आहे. ऐपतीप्रमाणे हॉटेल निवडावे असेही त्या म्हणाल्या. 

325  बेड अतिरिक्त केले आहेत पण बेड हवे असलेल्या रुग्णांची संख्या 2466 वर संख्या गेली आहे. 7 दिवसांच्या आत 1100 अतिरिक्त कोविड सेंटर कार्यरत होतील असेही त्या म्हणाल्या. तसेच उत्सवात बाहेर पडू नका असे आवाहन देखील त्यांनी केले. 

अग्निशमन दिनानिमित्ताने मॉक ड्रिल होणार नाही तसेच अग्निशमन सप्ताह देखील साजरा होणार नसल्याचे त्या म्हणाल्या. 

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने इमारतीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. इमारती सील केल्या जात आहेत. वेळ पडल्यास रुग्णांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी सांगितले जात असल्याचे त्या म्हणाल्या. 

खासगी रुग्णालयात लसीकरणास सुरुवात झाली आहे. आता २६६४ आयसीयु बेड आहेत. आयसीयु बेड ३२५ अतिरिक्त जोडले गेले असल्याची माहिती त्यांनी दिली.

महापालिकेची कठोर कार्यपद्धती 

नोडल ऑफिसकरकडून फास्ट ट्रॅक पद्धतीने बेड वाटप

24 वॉर्डातील वॉर रूमसाठी आणि जम्बो फिल्ड हॉस्पिटलसाठी नोडल आधिकाऱ्यांची नेमणूक करणार आहेत. तसेच दोन शिफ्टमध्ये करणार काम दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 यावेळेत नोडल अधिकारी काम पाहणार आहेत.

वॉर्ड वॉर रूम्सचे नोडल अधिकारी जंबो फील्ड हॉस्पिटल आणि वॉर रूम एकमेकांशी सतत संपर्कात राहतील जेणेकरून बेड्स लागणाऱ्या रूग्णांकरता बेडचे वाटप करणं सहज शक्य होईल 

विशेषत: रात्री 11 ते सकाळी  दरम्यान सर्व खाटांचे वाटप प्रामुख्याने फक्त जंबो फिल्ड हॉस्पिटलमध्ये आणि वॉर्ड वॉर रूम्समध्ये अनुक्रमे नोडल अधिकाऱ्यांकडून रात्री संपूर्ण फास्ट ट्रॅक पद्धतीनं  बेड वाटप केले जाईल.

हॉस्पिटलमधील बेडस् विनाकारण अडवले जाऊ नयेत म्हणून हॉटेल्सची मदत
काही मोठ्या तारांकित हॉटेल रूग्णांना मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध करुन देण्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले जातील. या केंद्रात प्रशिक्षित डॉक्टर्स नेमले जातील.