Maharahtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या (Amit Shah) मुंबई दौऱ्यादरम्यान मनसे भाजप युतीवर (BJP-MNS Allaince) विचारमंथनाची शक्यता आहे. अमित शाह एक दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राज ठाकरेंची भेट घेणार का याची उत्सुकता आहे. मनसे - भाजप - शिंदे गट (MNS-BJP-Shinde Group) एकत्र निवडणूक लढणार का यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतल्यावर शाह हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. गेल्या काही दिवसांत राज ठाकरे (Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट झाली आहे. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलीय. त्यामुळे शाहांच्या दौ-यात शिंदे गट - मनसे - भाजप एकत्र येणार का याची उत्सुकता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहे. याच दौऱ्यादरम्यान भाजप मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ करण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या अमित शाह यांच्याबरोबरच्या बैठकीत निर्णय होण्याचीही शक्यता आहे.
अमित शाह दरवर्षी लालबागचा राजाच्या दर्शनाला येत असतात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अमित शाह येऊ शकले नव्हते. यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह 5 सप्टेंबराल लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतीचंही ते दर्शन घेणार आहेत.