गणेश कवाडे, झी मीडिया, मुंबई : मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती हाती लागली आहे. ही टोळी मुळची हैदराबादमधली असून मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात रेकी करुन घरफोडी करत होती. विशेष म्हणजे ही टोळी हैदराबादवरुन विमानाने मुंबईत येत होती.
मुंबईत आल्यावर ओला-उबेर कारने या टोळीतील सदस्य मुंबईतील विविध भागात रेकी करत होते. त्यानंतर संधी साधत घरफोडी करुन पुन्हा विमानाने हैदराबादला जात असत. पवई पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या टोळीतील तिघांना अटक केली आहे.
काही दिवसांपासून मुंबईतल्या पवई हिरानंदानी परिसरात जलवायु विहारमध्ये या टोळीनी रेकी करून एका घरात 24 लाखांची घरफोडी केली आणि हैदराबादमध्ये पळून गेले. पण चोरीच्या सर्व प्रकार तिथे असलेल्या प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला होता. याच सीसीटीव्ही फुटेच आधारे पवई पोलिसांनी सापळा रचून थेट हैदराबाद मधून तीन आरोपींना अटक केली आहे.
या टोळीने आणखी कोणत्या भागात चोरी केली आहे का याविषयी तपास केला जात आहे. या आरोपी कडून चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे .