मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी ३८ टक्के मतदान

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान झालं आहे.

Jaywant Patil Updated: Mar 26, 2018, 01:34 AM IST
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी ३८ टक्के मतदान title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह 53 केंद्रांवर मतदान झालं आहे. सरासरी 38 टक्के मतदान झालं आहे. एकूण 62 हजार 559 पदवीधर मतदारांपैकी 24 हजार 168 मतदारांनी मतदान केलंय. 27 मार्चला मतमोजणीला आहे. मुंबईतल्या चेतना महाविद्यालयात शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

विद्यापीठातील गोंधळाविरोधात लढत-आदित्य ठाकरे

विद्यापीठात जो गोंधळ सुरु आहे, त्याविरोधात युवासेना निवडणूक लढवत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलंय. तसंच गेल्या निवडणुकीत युवासेनेला 8 जागा मिळाल्या होत्या. 

यश यंदाही मिळेल - आदित्य ठाकरे

तसंच यश यंदाही मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने आपलं 10 उमेदवारांचे संपूर्ण पॅनल निवडणुकीत उभे केलंय. तर गेल्या निवडणुकीत 2 जागा जिंकलेल्या मनसेच्या विद्यार्थी सेनेनं यंदा अचानक माघार घेतलीय.