मुंबई : राज्यावरील कोरोनाचे संकट (Coronavirus in Maharashtra) निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.144 कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत. जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता इतर महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून निर्बंध जारी करण्यात आले आहेत. आता शासनाकडून अत्यावश्यक सेवेमध्ये आणखी दोन विभागांचा समावेश केला आहे.
कोरोना (Coronavirus)रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने राज्य सरकारने बुधवारी रात्रीपासून नवीन नियमावली जाहीर केली आहे. 'ब्रेक द चेन' असे म्हणत लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. या निर्बंधांनुसार केवळ अत्यावश्यक सेवा (Essential Services) सुरू राहणार असून इतर सर्व हालचालींवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. अशावेळी आता राज्य सरकारकडून अत्यावश्यक सेवेमध्ये आणखी दोन विभागांचा समावेश केला आहे. महाविकास आघाडी सरकारने नवा आदेश जारी करत वनविभागातील वेगवेगळी कामे आणि विमान वाहतूक संबंधित कामांना प्रवासासाठी आणि कामासाठी सवलत देत त्यांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश केला आहे. त्याअंतर्गत काय सुरु राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे.
- कलम १४४ आणि रात्रीची संचारबंदी
- राज्यभर कलम १४४ लागू होणार
- खाली दिलेल्या कारणांव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही
-सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहतील
- जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार हे यातून वगळण्यात आले आहेत.
- अपवादश्रेणीत असलेल्या सेवा आणि व्यवहार सकाळी सात ते रात्री ८ या वेळेत कार्यालयीन दिवसांसाठी वगळण्यात आल्या आहेत.
- मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत.
जीवनावश्यक श्रेणीत या बाबींचा समावेश आहे
- रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लशीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात उत्पादन आणि वितरणसंबंधी आस्थापना असतील म्हणजे वितरक, वाहतूकदार, पुरवठा साखळीतले लोक. नशींचे उत्पादन आणि वितरण, सँनेटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे, इतर पूरक उत्पादने आणि सेवा.
- पाळीव प्राण्यांसाठीची खाद्यादुकाने, प्राण्यांसंबंधी सेवा, प्राण्यांचे निवारागृह आदी.
- वाण्याची किराणा सामानाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूधडेअरीज, बेकऱ्या, सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने
- शीतगृहे आणि वखारसेवाविषयक आस्थापना
- सार्वजनिक वाहतूक – हवाई सेवा, रेल्वेसेवा, टँक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या.
- विविध राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आणि अनुषंगिक सेवा
- स्थानिक प्रशासनांच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती कामे
- स्थानिक प्रशासनाची सर्व सार्वजनिक कामे
- ऱिझर्व्ह बँक आणि तिनं आवश्क ठरवलेली सर्व कामे
- सेबीनं मान्यताप्राप्त ठरवलेली सर्व कामं ज्यात स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिरी, क्लिअरिंग संबंधीची कामं अशी कामे
- दूरसंचार सेवांशी संबंधित सेवा, देखभाल दुरुस्ती
- मालवाहतूक
-पाणीपुरवठा विषयक सर्व कामे, सेवा
- शेतीशी संबंधित सर्व कामे आणि शेती निरंतरपणे होऊ शकेल यासाठीची सर्व कामे. य़ात बीबियाणे, खते, उपकरणे आणि दुरुस्ती हे सर्व समाविष्ट आहे.
- आयात निर्यात विषयक सर्व व्यवहार
- जीवनावश्यक वस्तूविषयक ई-कॉमर्स
- अधिस्वीकृतीप्राप्त माध्यमकर्मी
-पेट्रोल पंप आणि पेट्रोलसंबंधी उत्पादने, सुदूर समुद्रात वा किनारपट्टीवरील उत्पादने
- सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
-माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या क्लाऊडसेवा, डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधांसाठीच्या महत्त्वाच्या माहिती-तंत्रज्ञानविषयक सेवा
- सरकारी आणि खासगी सुरक्षारक्षक सेवा
- विद्युत तसेच गँसपुरवठा सेवा
- एटीएम आणि तत्संबंधीच्या सेवा
- टपालसेवा
- लस तसेच इतर जीवरक्षक औषधे आणि औषधी उत्पादकांचे कस्टम हाऊस एजंट तसेच परवानाधारक मल्टिमोडल वाहतूकदार
- कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे कच्चे माल किंवा वेष्टनसामुग्री बनवणारे कारखाने
- आगामी पावसाळ्यासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमधे कार्यरत कारखाने
- स्थानिक आपत्तीनिवारण प्राधिकरणाने जीवनावश्यक ठरवलेली कोणतीही सेवा
- सर्व अधिकारी कार्यालयांनी हे सर्व निर्बंध नागरिकांच्या वावरावर असून वस्तू आणि मालावर हीत, हे लक्षात घ्यावे.