मुंबई : निर्भया योजने अंतर्गत बलात्कार पीडितेसाठी निवारा केंद्र उभारण्यास जमीन मिळत नसल्यामुळे राज्यतले १६ केंद्रे अधांतरी आहेत. सध्या ही सर्व केंद्र जिल्ह्यातल्या महिला आधार केंद्रांमध्ये सुरू आहेत. गेल्या वर्षांत केवळ २१ केंद्रांना सरकारी जागा मिळाली आहे. या सर्व केंद्रांवर बंदोबस्तासाठी पोलीस तैनात नसल्यामुळे बलात्कार पीडितांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
‘निर्भया’ ची आधार केंद्रे अधांतरी असल्यामुळे बलात्कार पिडीतांची सुरक्षा वार्यावर पडली आहे. निर्भया योजनेंतर्गत बलात्कार पीडीतेसाठी निवारा केंद्रे (वन स्टॉप सेंटर) उभारण्यास जमीन मिळत नसल्यामुळे राज्यातील 16 केंद्रे अधांतरी आहेत. सध्या ही सर्व केंद्रे जिल्ह्यातील महिला आधार केंद्रांमध्ये सुरु आहेत. गेल्या तीन वर्षांत केवळ 21 केंद्रांना सरकारी जागा मिळाली आहे. पण या सर्व केंद्रांवर बंदोबस्तासाठी पोलीस तैनात नसल्यामुळे बलात्कार पिडीतांची सुरक्षा वार्यावर आहे.
2012 मध्ये घडलेल्या एका घटनेनंतर केंद्र सरकारने बलात्कार पीडीतेसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी वन स्टॉप सेंटर उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन वित्तमंत्री पी. चिंदबरम यांनी निर्भयासाठी 2013 मध्ये 1 हजार कोटींची तरतुद केली होती. आतापर्यंत 3 हजार 600 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. 2015 ते 2018 च्या दरम्यान केंद्र सरकारने विविध राज्यांना 854 कोटी रुपये पाठविले. त्यातून विविध राज्यांमध्ये वन स्टॉप केंद्रे उभारण्यात आली आहेत. ग्रामीण भागातून पोलीस ठाणे, न्यायालये किंवा रुग्णालयात येणे अशक्य असलेल्या पिडीतांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी निवारा असावा, ही त्यामागील भावना होती.
मुख्य प्रशासक, पोलीस, कायद्याचे ज्ञान असलेली सेवानिवृत्त व्यक्ती, विधी सल्लागार, वैद्यकीय कर्मचारी, समुपदेशक, पहारेकरी इत्यादी 14 कर्मचारी या केंद्रासाठी मंजूर आहेत. मात्र पिडीतेवर पुन्हा हल्ला झाल्यास त्यांच्या सुरक्षेसाठी एकही पोलीस कर्मचारी राज्यातील या केंद्रांवर नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींविरोधात गुन्हे दाखल झाले असल्यामुळे या केंद्रांमध्ये राहणार्या पिडीतांवर आरोपींच्या नातेवाईकांकडून हल्ला होण्याचीही शक्यता आहे.
वन स्टॉप सेंटरमधील पिडीतांची संख्या
मुंबई शहर 22, ठाणे 199, रायगड 1256, पालघर 140, पुणे 192, सातारा 138, सांगली 114, कोल्हापूर 4, नाशिक 202, औरंगाबाद 64, जालना 91, परभणी 65, हिंगोली 22, लातूर,14, नांदेड 23,अमरावती 18, अकोला 67, बुलडाणा 24, नागपूर 671, वर्धा 50, भंडारा 12, चंद्रपूर 53