मुंबई : वसईतील वालीव पोलिस स्टेशन क्षेत्रातील तुंगारेश्वर फाटा येथे एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी युवक पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. पीडितेच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे.
वसईतील तुंगारेश्वर फाटा येथे १३ वर्षीय मुलगी तीच्या आई-वडिलांसोबत राहते. तीचे वडील घराजवळच असलेल्या एका कंपनीमध्ये नोकरी करतात, त्याच कंपनीमध्ये आरोपीसूद्धा नोकरी करायचा. आरोपी युवक मुलीच्या वडिलांमध्ये चांगली मैत्री होती. त्यामुळे आरोपीच रोज घरी येत-जात असायचा.
मंगळवारी दुपारी 3 वाजता मुलगी घरी एकटी होती. याच वेळी आरोपीने घरी जाऊन मुलीवर जबरदस्ती करून बलात्कार केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी जमा झाले आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुरुवारी वसई न्यायालयात पोलिसांनी आरोपीला दाखल केले असता आरोपीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.