मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज संजय राऊत यांची ईडी कोठडी संपत आहे. यामुळे ईडली आज पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष PMLA न्यायालयात हजर करावे लागणार आहे. आज पुन्हा एकदा ईडी संजय राऊत यांची कोठडी मागण्याची शक्यता आहे.
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने 31 तारखेला रात्री उशीरा अटक केली होती. यानंतर 1 ऑगस्ट रोहेर संजय राऊत यांना कोर्टात हजर केले. ईडीकडून 8 ऑगस्टपर्यँत संजय राऊत यांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायाधीश एम. जी.देशपांडे यांनी एवढ्या कोठडीची गरज नसल्याचे म्हणत 4 ऑगस्टपर्यंतच ईडी कोठडी सुनावणी होती.
ईडीला संजय राऊत यांची कोठडी मिळताच दुसऱ्या दिवशी ईडीने दोन ठिकाणी छापे मारले होते. आता ईडी पुन्हा एकदा संजय राऊत यांची कोठडी आज मागण्याची शक्यता आहे. आता संजय राऊत यांच्याकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कालच संजय राऊत यांची जे.जे. रुग्णालयात मेडिकल टेस्ट करण्यात आली होती. आता आज पुन्हा राऊत यांची मेडिकल टेस्ट करणार की थेट त्यांना न्यायालयात हजर करणार हे थोड्या वेळात स्पष्ट होईल. संजय राऊत यांच्याकडून ऍड. अशोक मुंडरगी तर ईडीकडून ऍड. हितेन वेणेगावकर युक्तिवाद करतील.