मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात हजर केलं जाणार आहे. यामुळे कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे निर्माण होई नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ईडी कार्यालय, जे.जे. हॉस्पिटल परिसर आणि मुंबई सेशन कोर्टबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
मुंबई झोन 1 चे DCP डॉ. हरी बालाजी यांनी स्वतः मुंबई सेशन कोर्टच्या परिसरात येऊन सुरक्षेचा आढावा घेतला. दक्षिण मुंबईत एकूण चार ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आज जवळपास 200 पोलीस बल तैनात करण्यात आलं आहे.
100 पोलीस ईडी कार्यालयबाहेर बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले आहेत. तर 50 पोलीस जेजे रुग्णालय बाहेर आणि जवळपास 50 पोलीस सेशन कोर्टाच्या परिसरात बंदोबस्त करत आहेत.
2 फोर्स ईडी कार्यालय बाहेर
1 फोर्स जे.जे. रुग्णालय
1 फोर्स सेशन कोर्ट जवळ
दरम्यान आरोपपत्रात पत्राचाळ प्रकरणाचा उल्लेखच नाही असा दावा संजय राऊत यांचे भाऊ आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. खोट्या आरोपात संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.
आता नक्की कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे आहे याप्रकरणात संजय राऊत दोषी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.