दीपक भातूसे, झी मीडिया, मुंबई: खर्च कमी करण्यासाठी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. स्मारकातील पुतळ्याची एकूण उंची कायम ठेवण्यात आलेली असली, तरी अश्वारुढ पुतळ्य़ाची उंची ८३.२ मीटर वरून ७५.७ मीटरवर आणण्यात आलीय. तर, तलवारीची उंची ३८ मीटरवरून ४५.५ मीटर करण्यात आलीय. या बदलांमुळे सरकारच्या एकूण खर्चात ३३९ कोटी रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय स्मारकाच्य एकूण आराखड्यात अनेक बदल करण्यात आले असून, खर्चातल्या एकूण कपातीमुळे स्मारकाचा एकूण खर्च आता सुमारे साडे तीन हजार कोटींवरून खाली येणार असून २८०० कोटींवर आलाय.
खर्च कमी करण्यासाठी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा आणि तलवारीची उंची वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव
- अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याचा प्रस्तावित एकूण उंची १२१.२ मीटर होती
- यात घोड्यासह छत्रपतींच्या पुतळ्याची उंची ८३.२ मीटर आणि तलवारीची उंची 38 मीटर होती
- 88.8 मीटर उंचीचे स्मारक मिळून एकूण उंची २१० मीटर होती
- स्मारकाचा खर्च कमी करण्यासाठी सरकारने आता पुतळ्याची उंची कमी करून तलवारीची उंची वाढवण्याचे प्रस्तावित केले आहे
- नव्या बदलानुसार पुतळ्याची उंची ८३.२ वरून कमी करून ७५.७ मीटर, तर तलवारीची उंची ३८ मीटरवरून वाढवून ४५.५ मीटर करण्यात आली आहे
- या बदलामुळे स्मारकाच्या खर्चात ३३९ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
खर्चाच्या भीतीने छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यात मोठे बदल |Shivaji Memorial Off Arabian Sea To Get Cost Reduction in Mumbai