मुंबई : शिवसेनेच्या समस्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असताना, दुसरीकडे, शुक्रवारी शिवसेनेशी संबंधित आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे.
शुक्रवारी संध्याकाळी चारच्या सुमारास सहा शिवसैनिकांनी नेव्हीतून सेवानिवृत्त अधिकारी मदन शर्मा यांना बेदम मारहाण केली. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एक वादग्रस्त फोटो शेअर केला होता. ही बाब शिवसैनिकांना खटकली आणि त्यांनी या निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण केली. या हल्ल्यात शर्मा यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सायंकाळी उशिरापर्यंत या संपूर्ण प्रकरणात राजकारण तीव्र झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत खंत व्यक्त केली. तर अभिनेत्री कंगनाने देखील या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. कंगनाने म्हटलं की, महाराष्ट्रातील सरकारची दहशत आणि छळ दिवसेंदिवस वाढतच आहे.
आरोपी शिवसैनिकांना अटक
सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी शर्मा यांनी समता नगर पोलीस ठाण्यात शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर समता नगर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सर्व आरोपींना अटक केली आहे.
आरोपींची नावे
१) कमलेश चंद्रकांत कदम, वय 39.
२) संजय शांताराम मांजरे, वय 52२
3) राकेश राजाराम बेळणेकर, वय 31
4) प्रताप मोतीरामजी सुंद वेरा, वय 45
5) सुनील विष्णू देसाई, वय 42
6) राकेश कृष्णा मुळीक, वय 35