मुंबई : शिवसेनेत दोन गट नसून शिवसेना एकच आहे. शिवसेना आणि गद्दार अशी फाळणी सध्या झाली आहे. असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी झी 24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलाय. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय. झी 24 तासच्या कार्यालयातील बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आदित्य ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी बाप्पाची आरतीही केली.
मी जेव्हा मंदिरात जातो किंवा देवासमोर उभा असतो तेव्हा काहीही मागत नाही. कारण मनातलं जे काही असते ते देवाला सगळं माहित असतं. फक्त हात जोडून आर्शिवाद घेतो. बाकी काहीच नाही.
आमच्या मनात कोणतीही शंका नाही. काळजी नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच आहे. कोणी आतापर्यंत इतकं गलिच्छ राजकारण केलेलं नाही. दसरा मेळाव्याने कुठल्याही पक्षाने सहकार्य केलेले आहे. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
'शिवसेनेत 2 गट नाही. एक शिवसेना आहे आणि दुसरे गद्दार आहेत. एक दुख नक्की होतं की, महाराष्ट्रात जी पंरपरा होती, जी संस्कृती होती. जे काही आमदार या गद्दारातून बोलत आहेत. हे संस्कृतीला धरुन नाही. हे सगळं घाणेरडं सुरु आहे. आमदारांना गमदाटी करताना, गुंडगिरी करताना, 50 खोके पाहिजे असं विचारताना आपल्या राज्यात किंवा इतर राज्यात असं कधी ऐकलेलं नाही. ही संस्कृती कुठून आली हे मला माहित नाही.