अर्णब गोस्वामीच्या अटकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

पत्रकाराने सुद्धा मर्यादा पाळली पाहिजे

Updated: Nov 4, 2020, 10:33 AM IST
अर्णब गोस्वामीच्या अटकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया  title=

मुंबई : अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिस आज अर्णब गोस्वामीला अलिबाग न्यायालयात हजर करणार आहेत. या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'पोलिसांना धागेदोरे मिळाले असतील त्यांनी कारवाई केली आहे. याच्याशी सरकारचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. हा काळा दिन कसा असेल पत्रकाराने सुद्धा मर्यादा पाळली पाहिजे सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही का? असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला. (अर्णब गोस्वामी अटक प्रकरण : राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया)

 

एका जुन्या आत्महत्या केस प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर करवाई करण्यात आली आहे . मुंबई पोलिसांनी त्यांना मुंबई येथील राहत्या घरातून अटक केली आहे. २०१८ साली इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. (रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक) 

 

याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या अर्णब यांनी अलिबागमध्ये घेवून जाण्यात आल्याची माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता अर्णब गोस्वामी यांच्या पुढील अडचणी अधिक वाढल्या आहेत.