मुंबई : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. सोशल मीडियावर लतादीदींच्या प्रकृतीबाबत विचारणा सुरु झाली. दरम्यान, ही बातमी लतादीदींपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी ट्विट केले. मी उत्तम असल्याचे त्यांनी ट्विट करुन सांगितलेय. दरम्यान, त्याआधी त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनीही लतातदीदी यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले होते.
लतादीदी यांची प्रकृती उत्तम आहे. त्या रुग्णालयात नाही तर घरीच आहेत, अशी माहिती त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी 'झी 24 तास'ला दिली. दरम्यान, लता मंगेशकर यांनी शुक्रवारी ट्विटरवर आपल्या आरोग्याबद्दल स्पष्टीकरण दिलेय. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. तथापि, कोणीही सर्व अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर अशा अफवा पसरवू नका, असे आवाहन त्यांनी केलेय.
Namaskar. Meri sehat ke baare mein kuch afwaahein uth rahi hain Lekin aap in par vishwas na karein. Main bilkul swasth hun aur apne ghar mein hun.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 14, 2018
लता मंगेशकर यांनी ट्विट केलेय, "नमस्कार. माझ्या तब्बेतीबाबत काही अफवा उठविण्यात आल्यात. मात्र, तुम्ही यावर विश्वास ठेवू नका. मी चांगली आहे आणि मी आपल्या घरीच आहे."