राज्याचे कृषिमंत्री म्हणतात, 'आता पुढच्या वर्षी सुरळीत होईल'

मात्र शेवटच्या आठ दिवसांत शेतक-यांची एकच गर्दी झाल्याचं, राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यानी सांगितलं. 

Updated: Aug 5, 2017, 07:00 PM IST
 title=

मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजना केंद्राची असल्याने आपल्याला निकष पाळावे लागत होते. सरकार महिनाभर पीकविमा संदर्भात माहिती देत होतं. 

मात्र शेवटच्या आठ दिवसांत शेतक-यांची एकच गर्दी झाल्याचं, राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यानी सांगितलं. 

गेल्या वर्षी १ कोटीपेक्षा जास्त अर्ज आले होते, कारण प्रत्येक पिकाला वेगळा अर्ज करावा लागला होता. मात्र आता एकाच अर्जामध्ये विविध पिकांचे विमा काढण्यासाठी अर्ज करण्याची सोय असल्याचं फुंडकर म्हणाले.

 तर केंद्र सरकारच्या संबंधित पोर्टलनं काम केलं नाही, म्हणून शेतक-यांना खेटे घालावे लागल्याचं फुंडकरांनी सांगितलं. यावर्षी समस्या निर्माण झाली असली तरी, पुढील वर्षी ही सर्व प्रक्रिया सुरळीत होईल.