मुंबई : कोरोनारूग्णांची ( Coronavirus) संख्या मुंबईत (Mumbai) आटोक्यात आहे. मात्र तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटद्वारे केले आहे. कोरोनारूग्णांची संख्या मुंबईत आटोक्यात आहे. मात्र तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे केलं आहे. दिवाळीनंतर मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली तर मुंबई महापालिका प्रशासनाच्या तयारीबाबत पालकमंत्री आदित्य यांनी आढावा बैठक घेतली. मुंबई महापालिका प्रशासनातील अधिकारी, उपनगर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची आढावा बैठक झाली.
आज मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी बोरीकर जी, @mybmc चे AMC काकाणी जी यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या DMCs सोबत झालेल्या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे. pic.twitter.com/OAuDJrSINr
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 18, 2020
कोरोनाची दुसरी लाट आली तर प्रशासनाची काय तयारी आहे. पुरेसे बेडस् उपलब्ध आहेत का याची माहिती घेण्यात आली. त्यानुसार सर्व जम्बो फॅसिलीटी सेंटरमध्ये ओपिडी सुरु करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच, मोफत टेस्टिंग सेंटरवरही जादा कर्मचारी आणि इतर सुविधा देण्यात येणार आहेत. मुंबईतली कोरोनाग्रस्तांची संख्या आता तीन आकडी आहे. मात्र खबरदारी घेण्याची नितांत गरज आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी यासंबंधीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केल्याचंही आदित्य ठाकरेंनी ट्विट करून सांगितले.
राज्यात कोरोनाचा आकडा कमी होत आहे. परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा आकडा वाढू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालेकेच्यावतीने दुकानदार, फेरीवाले, बस चालक,कंडक्टर यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी १० नवे कोविड सेंटर उभारण्यात येणारेत. दरम्यान दिवसाला १२ ते १४ हजार कोरोना टेस्ट केल्या जातील, अशी माहिती एडिशनल मनपा आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली.