Uddhav Thackeray and Prakash Ambedkar Alliance, मुंबई : राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग पहायला मिळणार आहे. लवकरच महाराष्ट्रात नवी युती पहायला मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकत्र येणार आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटानं युती करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकल आहे. मात्र, महाविकासआघाडी त्यांना सामील करुन घेणार का? या एका प्रश्नावर या युतीची चर्चा आणखीच रंगली आहे.
प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्यात युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिलीय. या बैठकीत वंचितने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सांगण्यात आले. मात्र, वंचित बहुजन आघाडी केवळ शिवसेनेसोबत युती करणार की मविआचा घटक होणार याबाबत स्पष्टता आल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी मविआचा भाग होणार की फक्त शिवसेना-ठाकरे गटासोबत युतीयाबाबत अंतिम निर्णय ठाकरे घेणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीची शिवसेना सोबत आघाडी करण्याबद्दल चर्चा सुरु आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेट झाली. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा भाग बनविणार आणि चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवणार हे स्पष्ट करायला सांगण्यात आले आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल असे रेखा ठाकूर म्हणाल्या.