बागेश्री कानडे, झी २४ तास, मुंबई : कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचा परिणाम थेट मुंबईवर होताना दिसतोय. महापुरामुळे या जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक घटलीय. त्यामुळे भाज्यांचे दर भाव खात असून, सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागतेय. सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील महापूर आता केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून, याचा थेट परिणाम मुंबईवरदेखील होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. त्यामुळे या ठिकाणाहून मुंबई, नवी मुंबईत होणारी भाजीपाल्याची आवक कमालीची घटलीय. त्यामुळे दोन दिवसांपासून भाजीपाल्याचे दर दुप्पटीने वधारले आहेत...
भाजी दर
फ्लॉवर ५० ते ४० रु.
कोबी ४० ते ३० रु.
सिमला मिरची ५० ते ३० रु.
गाजर ५० ते ३० रु.
वांगी ४० ते २० रु.
फरसबी ४० ते २५ रु.
घेवडा ८० ते ४० रु.
दुधी ३० ते १५ रु.
भाज्यांच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागत आहे. आधीच श्रावण आणि त्यात भाजीपाला आणि दुधाची आवक घटलीय, त्यामुळे येणारे सणवार मुंबईकरांना महागात पडणार असं दिसतंय.