अनंत गिते संसदेत कडाडले

शिवसेनेने लोकपाल विधेयकाला कडाडून विरोध केला आहे. लोकपालच्या कक्षेत पंतप्रधानांना आणणं म्हणजे त्या पदाचा अवमान असल्याची भूमिका शिवसेनचे खासदार अनंत गिते यांनी मांडली. संसदेत विधायकावर चर्चा चालु असताना उपोषण कशासाठी असा सवालच त्यांनी केला आहे.

Updated: Dec 28, 2011, 12:13 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 शिवसेनेने लोकपाल विधेयकाला कडाडून विरोध केला आहे.  लोकपालच्या कक्षेत पंतप्रधानांना आणणं म्हणजे त्या पदाचा  अवमान असल्याची भूमिका शिवसेनचे खासदार अनंत गिते  यांनी मांडली. संसदेत विधायकावर चर्चा चालु असताना उपोषण  कशासाठी असा सवालच त्यांनी केला आहे.

देशाच्या  राज्यव्यवस्थेवर आणखी एका व्यवस्थेचा अंकुश कशासाठी  असा सवाल गिते यांनी केला आहे. संसदेत लोकपाल  विधेयकावर चर्चा चालू असताना अण्णांनी उपोषण तरी  कशासाठी असे अनंत गिते कडाडले.

[jwplayer mediaid="19398"]