www.24taas.com, लखनऊ
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी जी जाहीर आश्वासने दिली होती, त्याची तात्काळ अमलबजावणी करा आणि सहा महिन्यात बदल करून दाखवा, हे सांगताना लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांसाठी तयार राहावे, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी भविष्यवाणी केली आहे.
मुलायम यांनी राममनोहर लोहिया यांच्या १०२च्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले. लोकसभा निवडणुका केव्हा जाहीर होतील याचा नेम नाही. त्यामुळे पक्षाने दिलेली सर्व आश्वासने लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले टाकली पाहिजेत. राज्य सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी मी मुख्यमंत्री झालेलो नाही. कार्यकर्त्यांमध्ये राहून या कामावर लक्ष ठेवता येईल, असे ते म्हणाले. मुलायम सिंग यांनी मध्यवर्ती निवडणुकीची भविष्यवाणी केल्याने राजकीय चर्चेला जोर आला आहे.
अखिलेशला मुलायम सल्ला
लोकांसाठी वेळ ठेवला पाहिजे. लोकांना थेटपणे मुख्यमंत्र्यांना भेटता आले पाहिजे. आठवड्यातून तासभर का होईना, असा वेळ दिला पाहिजे. शेतकरी आणि गरीब नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने निर्णय घ्यावेत, असा सल्ला पिता आणि पक्षाचे प्रमुख या नात्याने मुख्य़मंत्री अखिलेश यादव यांना मुलायम यांनी दिला आहे.
दरम्यान, लोकांना विश्वास विकास करून संपादन करू. दगडांच्या बागा आणि स्वतःचेच पुतळे बसवून करणार नाही, अशी टीका अखिलेश यांनी मायावतींवर केली.