स्कूल बसबाबत शासनानं काढलेल्या जीआरचे पालन न करणाऱ्या स्कूल बसवर नवी मुंबई आरटीओतर्फे कारवाई सुरू आहे. या कारवाई अंतर्गत दोन आठवड्यात ५५ बसवर कारवाई करण्यात आली. तर पाच बस जप्त करण्यात आल्याएत. या बसमध्ये फस्टएड बॉक्स, अग्निशमन यंत्रणा तसंच योग्यता प्रमाणपत्र नसणं अशा त्रुटी आढळून आल्या.
नवी मुंबईत ६८३ स्कूल बस परवानाधारक असून त्यात व्हॅनचाही समावेश आहे. आरटीओतर्फे कारवाई सुरूच राहणार आहे. तर स्कूल बसबाबत मनविसेनं छेडलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून अशा स्कूल बस पकडण्यासाठी मनविसेनं भरारी पथक नेमलंय. या पथकानं जाळ्या नसलेल्या तीन स्कूल बस पकडून दिल्या आहेत.
आरटीओनं आपली अशी धडक कारवाई भविष्यातही सुरू ठेवली, तर भविष्यात होणारे अपघात टाळता येतील.