एका गावाचे सतराशे साठ नवरे!

त्रिंबकेश्वर नगरपालिकेत लोकशाहीची थट्टा सुरू आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात तब्बल पंधरा नगराध्यक्ष शहराच्या नशिबी आलेत. महाप्रसादाप्रमाणे नगरसेवकांना नगराध्यक्ष पद दिलं जात आहे.

Updated: Jul 19, 2012, 09:17 AM IST

www.24taas.com, नाशिक

त्रिंबकेश्वर नगरपालिकेत लोकशाहीची थट्टा सुरू आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात तब्बल पंधरा नगराध्यक्ष शहराच्या नशिबी आलेत. महाप्रसादाप्रमाणे नगरसेवकांना नगराध्यक्ष पद दिलं जात आहे.

त्रिंबकेश्वर नगरपालिकेत नगराध्यक्षांचा कार्यकाळ दाखवणारा हा फलक इथल्या राजकारण्यांची अफलातून कामगिरी दाखवण्यासाठी पुरेसा आहे. सर्वसंमतीनं सात जण इथं निवडून आलेत. तर मुद्दामहून रजेवर राहत सात जणांना नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी देण्यात आली. यात तर काही जण फक्त सात दिवसासाठी का होईना पण नगराध्यक्ष झाले.

अवघं सहा हजार इतकी मतदारसंख्या असलेल्या या शहरात सतरा नगरसेवक आहेत. तसंच दोन स्वीकृत नगरसेवक पकडून ही संख्या १९पर्यंत पोहचते. मात्र, इथल्या नेत्यांचा झपाटा पाहता सर्वांनाच नगराध्यक्षपदाची संधी मिळेल अशी चिन्हं आहेत. पण, नागरिक मात्र विचारतायत, एका मागोमाग एक नगराध्यक्ष बदलले जात असतील तर शहराचा विकास होणार तरी कसा?

.