www.24taas.com, लंडन
ऑफिसमध्ये वारंवार चहा, कॉफीचा अस्वाद घेणाऱ्यांनी आपली सवय सोडण्याचा पुन्हा विचार करणं आवश्यक आहे. लाइव्हसायंसमधील वृत्तानुसार एका नव्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे, की चहा, कॉफी किंवा इतर पेयांमधील कॅफिन मेहनती लोकांना आळशी बनवतं.
‘न्यूरोसाइकोफार्मकोलॉजी’ नावाच्या पुस्तिकेत प्रकाशित झालेल्या लेखात असं लिहीण्यात आलं आहे, की कॅफिनमुळे आळशी लोकांमध्ये तरतरी येत नाही. तरी काहींच्या मते एंफिटामाइनसारख्या उत्तेजक पदार्थामुळे काम करण्याचा उत्साह वाढतो असं मानलं जातं, पण यामुळे मेहनती माणसं आळशी होण्याची ही शक्यता असते.
ब्रिटीश कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या एका दलाने हा प्रयोग करून पाहिला. यासाठी उंदरांचा वापर केला गेला होता. या प्रयोगाचे प्रमुख हॉसकिंग हे यासंदर्भात बोलताना म्हणाले, की यात चांगली गोष्ट एकच आहे की कॅफिनमुळे आळशी लोक कामचुकार होत नाहीत. पण, कॅफिनमुळे काम करण्याची इच्छा मात्र कमी होत जाते.