www.24taas.com, सिडनी
सिडनी टेस्टमध्ये विराट कोहलीच्या मॅच फीमधून ५०% रक्कम कापण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींना बोट दाखविल्यानं त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. भारतीय बॉलर्सना कांगारुंना रोखण्यात अपयश येत होतं. त्यावेळी विराट कोहली बाऊंड्री लाईनजवळ फिल्डिंग करत होता. यावेळी क्रिकेटप्रेमींनी त्याला जाणूबूजून छेडलं. या साऱ्या प्रकारामुळे चिडलेल्या विराटनं आपल्या हाताचं मधलं बोट दाखवलं होतं. दरम्यान, कोहलीनं आपली बाजू स्पष्ट केली आहे. जर कुणी तुम्हाला आपल्या आई-बहिणींवरुन शिव्या देत असेल. तर साहजिकच तुम्ही गप्प बसू शकत नाही. त्यांनी वापरलेले शब्द अतिशय वाईट होते. त्यामुळेच मी अशी वर्तणूक केल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे.
भारताच्या फळीतला बॅट्समन विराट कोहलीने सिडनीतील ऑसी क्रिकेट प्रेक्षकांना फिल्डिंग करताना आक्षेपार्ह अंगुलीनिर्देश केल्याने त्याच्या मॅच रक्कमेतील ५०% रक्कम कापण्यात येणार आहे. टीमचे मिडीया मॅनेजर जीएस वालिया यांनी सांगितलं की, टीम मॅनेजर शिवलाल यादव यांच्यासोबत कोहलीला मॅच रेफरी रंजन मदुगुले यांनी तंबी दिली. तसचं कोहलीने केललं कृत्य मान्य केल्याने हा मुद्दा इथेच संपला असल्याचे मॅच रेफरी मदुगुले यांनी म्हंटलं आहे.
कोहलीला फोटोमध्ये फिल्डिंग करताना प्रेषकांना बोट दाखवल्याचे दाखवले आहे. हा फक्त आचारसंहिता दोन भंग केल्याच्या त्यावर आरोप आहे. ज्याचं त्याने उल्लघंन केले आहे. आतंरराष्ट्रीय मॅचमध्ये कोणाताही खेळाडू, साहाय्यक सहकारी, अंपायर, मॅच रेफरी किंवा अन्य व्यक्ती यांच्याविरोधात अश्या भाषेचा वापर करणं अपमानजनक आहे. यासाठी ५०% रक्कमेत कपात किंवा जास्तीत जास्त एका टेस्ट मॅचची बंदी येऊ शकते.
कोहलीने यासंदर्भात ट्विटर याचं समर्थन केलं आहे. मी या गोष्टीशी सहमत आहे की, क्रिकेटरने कोणतीच प्रतिक्रिया देता कामा नये. मात्र ऑसी प्रेक्षकांनी आई बहिणीवरून शिव्या देऊन अक्षरश: हैराण केलं होतं आजवर इतके वाईट प्रेक्षक मी पाहिले नव्हते. इंग्लडचा माजी कॅप्टन आणि एकेकाळी आयपीएलमधील टीम रॉयल चैलेंजर्स बेंगळुरू मध्ये कोहली सोबत खेळणाऱ्या केविन पीटरसनने ट्विटरवर कोहलीबाबत सहानुभूति दाखवली आहे. त्यांने म्हटंल आहे कि ऑस्ट्रेलियात तुमचं असचं स्वागत केलं जातं, तुम्ही त्यांना हरवून त्यांना अपमानित करण ं सुरू करा.