श्रीलंकेची दमदार सुरूवात

ब्रिस्बेन येथे भारत वि. श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वन डे मॅच मध्ये श्रीलंका भक्कम स्थितीत आहे. टॉस जिंकून श्रीलंकेने प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय देखील योग्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

Updated: Feb 21, 2012, 11:58 AM IST

www.24taas.com, ब्रिस्बेन

 

ब्रिस्बेन येथे भारत वि. श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वन डे मॅच मध्ये श्रीलंका भक्कम स्थितीत आहे. टॉस जिंकून श्रीलंकेने प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय देखील योग्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. डावाची सुरवात करण्यासाठी आलेल्या जयवर्धने आणि दिलशान यांनी त्यांच्या कॅप्टनचा निर्णय देखील सार्थ ठरवला. पहिल्या १५ ओव्हरपर्यत श्रीलंकेने त्यांची एकही विकेट गमावली नाही.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

तसचं  १५ ओव्हरपर्यंत त्यांनी ७० रन इतकी मजल मारली होती. त्यामुळे श्रीलंका सध्या तरी भक्कम स्थितीत असल्याचे दिसते. तर भारतीय बॉलर अगदीच निष्प्रभ ठरले. त्यांना श्रीलंकेची एकही विकेट झटपट घेता आली नाही. त्यामुळे आता श्रीलंका कुठवर मजल मारणार यावरच सामान्याचा निकाल लागणार आहे.

 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीजमध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान  आज  तिसरी वन डे मॅच सुरू आहे. श्रीलंकेने पहिले टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला. या आधी झालेल्या ऑस्ट्रेलिया सोबतच्या वन डे मॅच दरम्यान स्लो ओव्हर रेटमुळे महेंद्रसिंह धोनी याला एका वन डे मॅचला मुकावं लागलं आहे. त्यामुळे या मॅचमध्ये भारताचं नेतृत्व सेहवाग करणार आहे.