www.24taas.com, मुंबई
सचिन तेंडूलकरनं वनडेतून रिटायर व्हावं असा सल्ला कपिल देवनं दिला आहे. वीस वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यावर आता सचिननं थांबायला हवं. गेले तीन महिने त्याचा खेळ पाहाता वर्ल्ड कप पुर्वीच त्यानं रिटायरमेंटची घोषणा करायला हवी होती असं कपिलनं सांगितलं.
प्रत्येक खेळाडूला कुठं थाबायचं हे कळलं पाहिजं. सचिननं २२-२३ वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे हे अद्वितीय आहे. सध्या सुरु असलेल्या ट्राय सिरीजमध्ये सचिनला सुर सापडलेला नाही. सचिनला सेंच्युरीच्या सेंच्युरीची प्रतीक्षा आहे. त्याचा दबाव सचिनवर पडणार काय असं विचारता कपिलनं नकारार्थी उत्तर दिलं.
सचिननं याच्यापेक्षा जास्त दबावाखाली खेळला आहे. प्रत्येक खेळाडूंचा एक काळ असतो. सचिन आता ३८ वर्षांचा आहे. त्यामुळं त्यानं थांबायला हवं अशी अपेक्षा कपिलनं व्यक्त केली आहे. सचिन कपिल यांचा सल्ला मानणार का? हे पाहणं औत्सुक्याचं आहे.